वासिंद आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वासिंद आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड
वासिंद आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड

वासिंद आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड

sakal_logo
By

शहापूर, ता. २७ (बातमीदार) ः वासिंद आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी रात्री आठच्या सुमारास डाऊन मार्गावर मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने तब्बल एक तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली. चाकरमानी प्रवाशांना घरी जायची घाई असताना ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. दुसऱ्या इंजिनची व्यवस्था झाल्यानंतर एक तासाने रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. यामुळे डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचा खोळंबा झाला असून कसाऱ्याकडे जाणाऱ्या असंख्य प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला. मालगाडीच्या इंजिनमध्ये वारंवार होणाऱ्या या घटनांकडे रेल्वेप्रशासन कायम दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागत असल्याबाबत रेल्वे संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख शैलेश राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80280 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top