
विरारमध्ये वाडवळी बाजारपेठचे आयोजन
विरार, ता. २८ (बातमीदार) : सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ दरवर्षी डहाणू ते मुंबई या विभागात वाडवळी बाजारपेठेचे आयोजन करीत असतो. कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या कालावधीत सर्वच कार्यक्रम ठप्प झाले होते. आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असून वाडवळी बाजारपेठेचे दोन दिवसीय आयोजन विरार पश्चिम येथील मंगलमूर्ती गणपती हॉल, जुने विवा कॉलेज समोर या ठिकाणी संघाच्या विरार शाखेने शनिवार (ता. ३०) ते रविवार (ता. १ मे) केले आहे. सदर बाजारपेठ दोन्ही दिवशी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
वाडवळी मसाले, पापड, लोणची, वेगवेगळ्या प्रकारचे सरबत, आवळा कँडी, चिकू प्रक्रिया उत्पादने, सुकेळी, घाण्याचे तेल, आधुनिक कपड्यांचे विविध प्रकार, इमिटेशन ज्वेलरी, आर्ट क्राफ्ट असे अनेक खाद्य पदार्थांचे प्रकार उपलब्ध असणार आहेत. या बाजारपेठेचे उद्घाटन सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे अध्यक्ष नरेश राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. असून कार्यक्रमाला उद्योजिका साधना राजीव पाटील, सदानंद कवळी उपस्थित राहणार आहेत; तर बाजारपेठेचा सांगता समारंभ रविवारी रात्री १० वाजता होणार असून वसई-विरार महापालिकेच्या माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर, सचिन पाटील, प्रफुल्ल म्हात्रे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80298 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..