मोबाईल चोरट्याला रेल्वे पोलिसांनी केली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल चोरट्याला रेल्वे पोलिसांनी केली अटक
मोबाईल चोरट्याला रेल्वे पोलिसांनी केली अटक

मोबाईल चोरट्याला रेल्वे पोलिसांनी केली अटक

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २८ ः लोकल तसेच एक्स्प्रेसमधील दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर काठीचा फटका मारून मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. गोरख शिगवे असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्यावर यापूर्वी ५ ते ६ चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
मंगळवारी सोमनाथ धोत्रे (१९) विद्यार्थी कल्याण ते इगतपुरी असा प्रवास करीत होता. एक्स्प्रेसच्या दारात उभे राहून तो मोबाईलवर बोलत होता. गाडी कसारा स्टेशन सोडत असतानाच ट्रॅकच्या बाजूला हातात काठी घेऊन उभ्या असलेल्या गोरखने सोमनाथच्या हातावर काठीचा फटका मारला. त्याचा मोबाईल खाली पडताच तो मोबाईल घेऊन गोरखने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोमनाथ व इतर प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी गोरखचा पाठलाग करून त्याला अटक केली. त्याची झडती घेतली असता चोरीचा मोबाईल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. गोरख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरोधात आत्तापर्यंत ५ ते ६ गुन्हे दाखल आहेत. प्रवाशांनी लोकलच्या दारात उभे राहून फोनवर बोलू नये, फोन हातात धरू नये असे आवाहन यावेळी रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80314 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top