
लालपरी पुन्हा पूर्वपदावर
कल्याण, ता. २८ (बातमीदार) ः कोरोनानंतर कर्मचारीवर्गाचा संप सुरू राहिल्याने एसटी सेवा ठप्प झाली होती. मात्र सध्या कल्याण आगारातील सर्व संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे लालपरी पूर्वपदावर आली आहे.
कल्याण -अहमदनगर, कल्याण -पुणे, भिवंडी, पनवेल, या लोकल फेऱ्यांसह लांब पल्ल्याच्या उन्हाळी गर्दीच्या हंगामातील फेऱ्यादेखील सुरू करण्यात आल्या आहेत. सर्व फेऱ्या प्रवाशांना संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कल्याण - आळेफाटा, कल्याण - भोरगिरी, कल्याण - चिपळूण, कल्याण - शिवथरघळ, कल्याण - लातूर, कल्याण - तुळजापूर, कल्याण - पंढरपूर, कल्याण - जळगाव, कल्याण - रावेर, कल्याण - साक्री इत्यादी मार्गावर लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. दररोज २५ ते २६ हजार किमी बसेस धावत असून सुमारे ६८ बसेसच्या माध्यमातून पाचशेच्या वर फेऱ्या होत आहेत. कोरोनापूर्वीचा उत्पन्नाचा पल्ला आगाराने गाठला असून पुढील काळात आणखी बसेस उपलब्ध झाल्यास त्यात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण एसटी डेपो व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80375 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..