एनआयसीयूमुळे नवजात बाळांना जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनआयसीयूमुळे नवजात बाळांना जीवदान
एनआयसीयूमुळे नवजात बाळांना जीवदान

एनआयसीयूमुळे नवजात बाळांना जीवदान

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांमध्ये विकृती आणि मृत्युदर कमी करण्यासाठी उत्तम दर्जाच्या एनआयसीयूची आवश्यकता असते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक एनआयसीयूमुळे मुदतपूर्व नवजात आणि आजारी नवजात शिशूंवर उत्तम आणि दर्जेदार उपचार केले जातात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात महिनाभरात जवळपास शंभरहून अधिक मुदतपूर्व बाळांवर उपचार केले जातात. नवजात बाळांमध्ये येणाऱ्या श्वसनाशी संबंधित गुंतागुंत निर्माण झालेली असते. परिणामी
फुफ्फुसातील विकार, जंतुसंसर्ग, डोळ्यांचे विकार, मेंदूविकार आदी समस्या उद्‍भवल्यास त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टची आवश्यकता असते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दरमहा सरासरी एक हजार प्रसुती केल्या जातात. त्यापैकी किमान १०० नवजात बाळांना एनआयसीयूची आवश्यकता भासते. अशा बाळांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात बालरोग तज्ज्ञांची एक विशेष टीम सज्ज आहे. त्यामध्ये डॉ. राजाराम वेलिंग, डॉ. प्राजक्ता जोशी, डॉ. नीलिमा नारखेडे आणि डॉ. मुकुंद शिरोळकर आदींचा समावेश आहे. तसेच येथील एनआयसीयूमधील व्हेंटिलेशन, नेत्रतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, तसेच आपत्कालीन यूएसजी मशीन आणि इको मशीन उपलब्ध आहे.
---
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये उपलब्ध सुविधांमुळे ५०० ते ६०० ग्रॅम वजनाच्या बाळांना वाचवण्यात यश आले आहे. त्यामुळे बालकांचा मृत्युदर कमी होण्यास मदत होईल.
- डॉ. विद्या ठाकूर, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, उपनगरीय रुग्णालयेय

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80445 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top