
बदलापुरात विजेचा लपंडाव
बदलापूर, ता. ३० (बातमीदार) ः ऐन उन्हाळ्यात विजेच्या लपंडावाने बदलापूरकर हैराण झाले आहेत. लोडशेडिंग नसतानाही काही ना काही कारणाने सारखी विज जात असल्याने नागरिक घामाघूम होत आहेत.
पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटणे, मृत किंवा धोकादायक झाडे हटवणे, विजेच्या तारा बदलणे, इतर सगळी तांत्रिक कामे करण्याच्या नावाखाली शहरात रोजच काही ना काही काळासाठी विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यात आठवड्यातून एक दिवस या कामांसाठी साधारण सहा ते सात तासांसाठी वीजपुरवठा खंडित केला जातोय. यामुळे बदलापूरकर ऐन उन्हाळ्यात घामाघूम झाले आहेत. सकाळच्या कामाच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरातील कामे खोळंबत असल्याचे महिला सांगत आहेत.
बदलापूर शहरात सतत वीजपुरवठा खंडित होत नाहीये. फक्त काही तांत्रिक कामानिमित्त महिन्यातून आम्ही फार फार तर दोन ते तीन वेळा काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित करत आहोत. पण, पावसाळ्यापूर्वी ही कामे होणे आवश्यक असल्याने, बदलापूरकरांनी महावितरणला सहकार्य करावे.
- मनोज कराड, उपअभियंता, महवितरण
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80510 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..