
वीजबचत करण्याचे कंपन्यांकडून आवाहन
मुंबई, ता. ३० : कडक उन्हाळ्यामुळे घराघरांमध्ये वीज वापर वाढला असून आणखी दोन महिने हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली असल्यामुळे ग्राहकांनी विजेचा वापर जपून करावा, असे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे. अन्यथा मोठी वीजबिले येतील, असा इशाराही देण्यात येत आहे.
कडक उन्हामुळे सगळीकडेच कुलर, फ्रिज, एसी, पंखे यांचा वापर वाढला आहे. हा उन्हाळा अजून दोन महिने सुरू राहणार असल्यामुळे राज्यातील विजेची मागणीही वाढणारच आहे. मुंबईतच विजेचा वापर १०% वाढल्याची माहिती अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वीज बिलेही मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी विजेचा वापर जपून करावा, असे सांगितले जात आहे.
ग्राहकांनी पाच तारांकित वीज उपकरणांचा वापर करावा. त्यामुळे विजेचा खप कमी होतो. एसीचे तापमान २४ ते २६ अंश यादरम्यान ठेवावे. तसेच एसी सुरू असताना गार हवा सर्व खोलीभर पसरावी यासाठी मधूनच खोलीतला पंख सुरू करावा, अशा वीज बचतीच्या टिप्सही वीज कंपन्यांनी दिल्या आहेत.
...
निर्मितीच्या खर्चात वाढ
सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कोळसा आणि कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. याच साधनांच्या साह्याने वीजनिर्मिती होत असल्याने वीज निर्मितीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे भविष्यकाळात विजेचे दरही वाढू शकतात, असा इशाराही यासंदर्भात दिला जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80514 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..