कामगारदिनी मुक्त वेठबिगार बांधवांचा मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगारदिनी मुक्त वेठबिगार बांधवांचा मेळावा
कामगारदिनी मुक्त वेठबिगार बांधवांचा मेळावा

कामगारदिनी मुक्त वेठबिगार बांधवांचा मेळावा

sakal_logo
By

विरार, ता. ३० (बातमीदार) ः श्रमजीवी संघटनेच्या संघर्षमय वाटचालीची चार दशके पूर्णत्वास येत असतानाच ज्या प्रश्नावर संघटना उभी राहिली त्या वेठबिगारी मुक्तीच्या लढ्याच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. १ मे अर्थात कामगार दिनाचे औचित्य साधून श्रमजीवी संघटनेने मुख्यालय उसगाव येथे ‘मुक्त वेठबिगार बांधवांचा मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. १ मे रोजी होणाऱ्या मेळाव्यात संघटनेच्या स्थापनेच्या वेळी मुक्त झालेले अनेक वेठबिगार जे आजही हयात आहेत, त्यांची उपस्थिती लक्षवेधी असणार आहे. या मुक्त वेठबिगार बांधवांचे, त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात सरकारची भूमिका आणि कृती याबाबतही चर्चा होणार असून येत्या काळात मुक्त वेठबिगार पुनर्वसनाबाबत संघटना आग्रही आणि आक्रमक असेल, असे मत श्रमजीवीचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80516 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top