तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास मुदतवाढ
तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास मुदतवाढ

तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास मुदतवाढ

sakal_logo
By

मालाड, ता. ३० (बातमीदार) ः कोरोना प्रादुर्भाव काळात आर्थिक झळ सहन कराव्या लागलेल्या राज्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मासेमारीकरिता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव, जलाशयांची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच २०२१-२२ तलाव ठेक्याची रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी (ता. २९) दिली.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी राज्यात घोषित लॉकडाऊनमुळे राज्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना पूर्ण क्षमतेनुसार मासेमारी करता आली नाही, तसेच उत्पादित मासळीची विक्री करण्यास पुरेसा वाव न मिळाल्यामुळे मच्छीमारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80517 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top