द्विशिक्षकी शाळांच्या सक्षमीकरणासाठी परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्विशिक्षकी शाळांच्या सक्षमीकरणासाठी परिषद
द्विशिक्षकी शाळांच्या सक्षमीकरणासाठी परिषद

द्विशिक्षकी शाळांच्या सक्षमीकरणासाठी परिषद

sakal_logo
By

धारावी, ता. ३० (बातमीदार) : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचातर्फे ‘द्विशिक्षकी शाळांचे सक्षमीकरण’ या विषयावर शैक्षणिक परिषदेचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे सोमवारी (ता. २) सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० यादरम्यान करण्यात आले आहे. परिषदेच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे आहेत.
शिक्षणाचा विचार करणारा आणि त्यातून कृतीप्रवण होणारा समाज घडवणे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिक्षण विकास मंच कार्यरत आहे. हा मंच शैक्षणिक प्रश्न, शैक्षणिक उपक्रम, शैक्षणिक धोरण इत्यादी बाबींच्या अनुषंगाने उत्प्रेरक म्हणून काम करतो. यंदा ‘द्विशिक्षकी शाळांचे सक्षमीकरण’ या विषयावर शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. आजमितीला महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या ६१,००० प्राथमिक शाळांपैकी जवळपास ३८,००० शाळा दोन शिक्षकी आहेत. या दोन शिक्षकी शाळा प्रामुख्याने वाड्या-वस्त्यांवर आणि अगदी छोट्या गावांत आहेत. या शाळांची विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याने त्या आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या नाहीत, म्हणून बंद करण्याची चर्चा अधूनमधून होत असते. तथापि या दोन शिक्षकी शाळा अत्यंत प्रभावीपणे काम करताना आणि विद्यार्थी घडवताना दिसत आहेत. त्यामुळे या शाळा बंद न पडता त्यांचे सक्षमीकरण व्हावे आणि त्या अनुषंगाने पालक आणि शिक्षक यांची मनोभूमिका, शासनाची भूमिका, इत्यादी गोष्टींवर विचारमंथन व्हावे, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. शिक्षण विकास मंचाचे क्षेत्र समन्वयक योगेश कुदळे यांनी कळवले आहे.
...

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80518 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top