नवी मुंबई भाजपचे कंदील आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबई भाजपचे कंदील आंदोलन
नवी मुंबई भाजपचे कंदील आंदोलन

नवी मुंबई भाजपचे कंदील आंदोलन

sakal_logo
By

तुर्भे, ता. ३० (बातमीदार) : महावितरण आणि राज्य सरकारविरोधात भाजपकडून नवी मुंबईत कंदील आंदोलन करण्यात आले. डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, अशोक चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ येथील भाजप मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र वीज वितरण मंडळ व सरकारच्या नियोजनशून्य व गलथान कारभाराचा निषेध भाजप कार्यकर्त्यांनी केला. वीज बिल ग्राहकांना आलेली वाढीव बिले, अनावश्यक अवाजवी अमानत रक्कम बिले, जनतेवर वीज पुरवठ्याचे ओढवलेले संकट अशा प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा विषय गांभीर्याने हाताळावा व या त्रासापासून जनतेस मुक्त करून पुढील योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. या वेळी भाजपच्या माजी नगरसेविका माधुरी सुतार, अंबिका नायर, रीमा नाथ, मीनाक्षी हिलाल, अनिता पाटील, ललिता घोडगे, आदी भाजप पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80520 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top