जखमी हरणाला जीवनदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जखमी हरणाला जीवनदान
जखमी हरणाला जीवनदान

जखमी हरणाला जीवनदान

sakal_logo
By

मुरबाड, ता. ३० (बातमीदार) ः पोटगावच्या जंगलात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या हरणाला मुरबाडमधील तरुणांनी वन विभागाच्या ताब्यात देत जीवनदान दिले. अज्ञात वाहनाच्या धडकेत हे हरीण जखमी झाले होते. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
कल्याण येथून मुरबाडकडे येत असलेल्या मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, विशाल बिडवी, पंकज दलाल यांना पोटगावच्या जंगलात एका हरीण रस्त्यावर जखमी पडलेले दिसले. अनोळखी वाहनाच्या धडकेत ते जखमी झाले होते. रामभाऊ दुधाळे यांनी आपली गाडी थांबवून मागून येत असलेली पीकअप गाडी थांबवली. दुधाळे यांच्यासह विशाल बिडवी, पंकज दलाल यांनी हरणाला गाडीतून नेत मुरबाड वन विभागाच्या ताब्यात दिले. वन विभागाने या हरणावर प्राथमिक उपचार केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80528 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top