विद्यार्थ्यांची पनवेल तहसील कार्यालयाला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांची पनवेल तहसील कार्यालयाला भेट
विद्यार्थ्यांची पनवेल तहसील कार्यालयाला भेट

विद्यार्थ्यांची पनवेल तहसील कार्यालयाला भेट

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ३० (वार्ताहर) : लोकमान्य टिळक लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पनवेल तहसील कार्यालयाला शैक्षणिक भेट आयोजित केली होती. यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी जमीन विषयक, कायदे संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न तहसीलदारांना विचारले. न्यायालयीन अधिकार काय असतात, महसूल संबंधातील नियम काय असतात, तसेच सातबारा, आठ अ, फेरफार विषयीची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. संजीव मांडे यांनीदेखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80529 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top