विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याचे मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याचे मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याचे मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याचे मार्गदर्शन

sakal_logo
By

उरण, ता. ३० (वार्ताहर) : फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात उद्योजक घडवू या या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्‍घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजीवन म्हात्रे होते. त्यांनी आपल्या बहारदार हास्य शैलीत विद्यार्थ्यांनी उद्योजक का व्हावे व उद्योजक होण्यासाठी आपल्या स्वतःमध्ये फक्त हिंमत, सातत्य व विनम्रता आवश्यक आहे असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार हे होते. महाविद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी उद्योजक कसे बनतील, या प्रयत्नात आजची कार्यशाळा हे पहिले पाऊल आहे. पुढील शैक्षणिक वर्षांत उद्योजक व्हावे, असे अपेक्षा व्यक्त करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे विशेष उपक्रम राबविण्यात येईल व त्यांना उद्योजक होण्यासाठी लागणारी सर्व माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करण्यात येईल, असे प्राचार्य पवार यांनी जाहीर केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80530 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top