महाविद्यालयांत मतदार नोंदणी करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविद्यालयांत मतदार नोंदणी करा!
महाविद्यालयांत मतदार नोंदणी करा!

महाविद्यालयांत मतदार नोंदणी करा!

sakal_logo
By

मुलुंड, ता. ३० (बातमीदार) ः माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महाविद्यालय व्यवस्थापनाद्वारे सर्व पात्र विद्यार्थ्यांची नावे मतदान यादीत समाविष्ट करण्याचे अधिकार महाविद्यालय प्रशासनाला द्यावेत अशी विनंती केली आहे. याशिवाय पात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्र देण्याचे आवाहनही प्रकाश गंगाधरे यांनी पंतप्रधानांना केले आहे.
गंगाधरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा, राज्य, विधानसभा आणि नगर परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगामार्फत नवीन मतदार नोंदणी, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती, फेरफार मतदारांची नावे वगैरे मतदानापूर्वी केली जातात. या मोहिमेंतर्गत विविध राजकीय पक्ष पुढे आले असून नवीन मतदार नोंदणीसाठी प्रयत्नशील आहेत; मात्र अनेकांना आपली नावे कोणत्याही राजकीय पक्षामार्फत न करता स्वतंत्रपणे मतदार यादीत नोंदवण्याची इच्छा आहे. म्हणूनच महाविद्यालयांत सुविधा देण्यात यावी.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80536 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top