इन्फ्लूएंझा सदृश्‍य आजारांवर नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इन्फ्लूएंझा सदृश्‍य आजारांवर नजर
इन्फ्लूएंझा सदृश्‍य आजारांवर नजर

इन्फ्लूएंझा सदृश्‍य आजारांवर नजर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असताना, पालिकेने पुन्हा इन्फ्लूएंझा-सदृश आजार आणि सारीची तक्रार करणाऱ्या नागरिकांची तपासणी व देखरेख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, पालिकेने रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना ओपीडीत येणाऱ्या संशयित रुग्णांना सूचित करण्याचे निर्देश दिले आहेत.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, की आम्ही कोविड प्रकरणांचे निरीक्षण करत आहेत. आरोग्य अधिकारीही सुपर स्प्रेडर्सची तपासणी करण्याचे नियोजन करत आहेत, कारण ते दररोज हजारो लोकांच्या संपर्कात येतात. शिवाय, आयएलआय आणि सारी रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कारण ते सार्स कोविड- २ विषाणू पसरवू शकतात. डॉ. गोमारे यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवले जातील, ज्यामुळे विषाणूचे आणखी उत्परिवर्तन होत आहे की नाही हे कळण्यास मदत होईल.

अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, की आमच्याकडे संपूर्ण मुंबईत २६६ केंद्रे आहेत, ज्यात आमचे सर्व दवाखाने, प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे यांचा समावेश आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या नातेवाईकांची आणि जवळच्या संपर्कांची कोविड- १९ चाचणी केली जाईल आणि लक्षणांच्या तीव्रतेनुसार रुग्णाला होम क्वारंटाईन केले जाईल.

हाय रिस्क लोकांच्या तपासणीचे नियोजन
पालिकेने भाजी विक्रेते, दुकानदार, फेरीवाले, ऑटो-टॅक्सी-बस ड्रायव्हर, कंडक्टर हे सुपर स्प्रेडर बनू नये म्हणून त्यांची तपासणी करण्याची योजना आखली आहे. सुमारे २.५ लाख असे नागरिक आहेत ज्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. नोव्हेंबर २०२० मध्ये जेव्हा पालिकेने या उच्च-जोखीम लोकांची तपासणी केली तेव्हा एका आठवड्यात १५० विक्रेत्यांना व्हायरसची लागण झाल्याचे आढळले. काकाणी म्हणाले, की दुसऱ्या लाटेत कोविड- १९ ची साखळी तोडण्यासाठी आम्ही विक्रेते, बस ड्रायव्हर आणि कंडक्टर, ऑटो-टॅक्सी चालक, फेरीवाले यांच्या संपर्कातील उच्च जोखमीच्या लोकांची तपासणी केली होती. जर रुग्णांमध्ये सतत वाढ होत असेल तर आम्ही पुन्हा एकदा अशा गटांची तपासणी करण्याचा विचार करत आहोत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80541 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top