बारावे कचरा प्रकल्पाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारावे कचरा प्रकल्पाला आग
बारावे कचरा प्रकल्पाला आग

बारावे कचरा प्रकल्पाला आग

sakal_logo
By

कल्याण, ता. ३० (बातमीदार) ः कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कल्याण पश्चिमेला असलेल्या सुका कचरा वर्गीकरण प्रकल्पाला शनिवार दुपारी १२-१२.३० च्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
२०० टनाहून अधिक सुका कचरा बारावे येथे आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पात आग लागल्याने खळबळ उडाली. कचऱ्याला आग लागली त्या वेळी मोठ्या प्रमाणात वारा सुटला होता, त्यामुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र जोरदार वाऱ्यामुळे त्यांच्या कामात अडचण येत होती. आग नियंत्रणात असून कुठलीही जीवित हानी न झाल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाने स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80542 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top