महापालिकेच्यावतीने कामोठ्यात आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

panvel mahanagarpalika
महापालिकेच्यावतीने कामोठ्यात आरोग्य शिबिर

महापालिकेच्यावतीने कामोठ्यात आरोग्य शिबिर

पनवेल : पनवेल महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अंतर्गत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मे रोजी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कामोठे येथील माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयात करण्यात आले आहे. नागरिकांनी सदर आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले. कामोठे सेक्टर ९ येथील माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजन केले आहे. महापालिका आयुक्त, उपायुक्त, अधिकारी वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिबिर संपन्न होणार आहे. सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटीच्या दहापेक्षा जास्त सभासदांनी एकत्र येऊन रक्तदान केल्यास सदर संस्थेला विशेष सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80543 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top