काटई-शीळ प्रवास आता सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काटई-शीळ प्रवास आता सुसाट
काटई-शीळ प्रवास आता सुसाट

काटई-शीळ प्रवास आता सुसाट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ३० : सकाळ, सायंकाळ वाहतूक कोंडींमुळे डोकेदुखी ठरत असलेला काटई-शिळ मार्गावरील प्रवास आता सुसाट होणार आहे. या मार्गाला पर्याय म्हणून तळोजा औद्योगिक वसाहत ते मुंबई-पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ पर्यंतचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. विकास आराखड्यातील या प्रस्तावित रस्त्याच्या बांधकामाची निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नुकतीच जाहीर केली. ९९ कोटी ५१ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या रस्त्यामुळे कल्याण, डोंबिवलीहून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पोहोचणे सोपे होणार आहे.

----------
मुंबई आणि उपनगरात काम करणारे बहुतांश नोकरदार हे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या परिसरात राहणारे आहेत. प्रवासासाठी या नोकरदारांना लोकलचा मोठा आधार असला तरी रस्ते वाहतुकीचा आधार घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे मुंबई गाठण्यासाठी त्यांना शिळफाटा, ठाणे, नवी मुंबई असा प्रवास करावा लागतो; मात्र हा प्रवास करताना त्यांना शिळफाटा येथील वाहतूक कोंडीचाच जास्त त्रास सहन करावा लागतो. विशेषतः काटई ते शिळ या अवघ्या काही मिनिटांच्या अंतरासाठी त्यांचा तास ते दीड तास वाया जात आहे. ही कोंडी फोडण्यासाठी ऐरोली-काटई एलिव्हेटेट मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम गतीने सुरू असले तरी आणखी एका पर्यायी मार्गाची नितांत गरज आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात नुकताच एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांची भेट घेतली. वाहतूक आणि दळणवळणाला वेगवान करणाऱ्या प्रकल्पांच्या या कामांचा आढावा घेत त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाला जोडल्या गेलेल्या शेजारच्या तळोजा औद्योगिक वसाहतीचा भाग थेट राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ला जोडण्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी यावेळी केली. एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांनी या कामाला हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार आता एमएमआरडीएच्या वतीने तळोजा औद्योगिक वसाहत ते राष्ट्रीय महामार्ग क्र. चारपर्यंतच्या या रस्त्याची निविदा जाहीर करण्यात आली आहे. एकूण ९९ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चातून या रस्त्याची उभारणी केली जाणार आहे.

वेळ व इंधनाची बचत
काटई-शिळ पर्यायी रस्त्यामुळे कल्याण-डोंबिवली या शहरातून थेट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला पोहोचणे सहज सोपे होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. वाहन चालकांना महामार्गाशी जोडण्याचा आणखी एक पर्याय या मार्गामुळे उपलब्ध होणार असल्याने कोंडीही फुटण्यास मदत होणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80544 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top