चौल-रेवदंडा पर्यटनाच्या उंबरठ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौल-रेवदंडा पर्यटनाच्या उंबरठ्यावर
चौल-रेवदंडा पर्यटनाच्या उंबरठ्यावर

चौल-रेवदंडा पर्यटनाच्या उंबरठ्यावर

sakal_logo
By

चौल-रेवदंडा पर्यटनाच्या उंबरठ्यावर

अभय आपटे, रेवदंडा
अलिबाग तालुक्यातील चौल-रेवदंडा ही दोन्ही गावे पर्यटनाला चालना मिळण्याच्या उंबरठ्यावर उभी आहेत. चौलला नारळी-पोफळींच्या बागायती व पुरातन मंदिराचा वारसा आहे. तर रेवदंड्याला शांत-सुरक्षित असा किनारा लाभला आहे. मात्र, या गावांमध्ये अनेक सुविधांची वानवा असल्याने पर्यटनाची वाढ खुंटली असून त्यासाठी उपायायोजना आवश्‍यक असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे.
--------------------------
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या गावांना अनेकांनी सेकंड होम म्हणून पसंती दिली आहे. चौल-रेवदंडा या ठिकाणी लोकसंख्या वाढत चालली असून शहरीकरण वेगाने होत आहे. टूमदार दोन पाखी कौलारू घरांची जागा आता टोलेजंगी इमारतींनी घेतली आहे. या गावाला एकच मुख्य रस्ता असून तो अनेक ठिकाणी नागमोडी वळणाचा व अरूंद आहे. त्यामुळे पर्यटकांना चौल-रेवदंडा संपून कुंडलिका खाडीवर कधी वाहने पोहोचतात, हे समजू शकत नाही. राज्य आणि केंद्र सरकार पर्यटन व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. या व्यवसायात आर्थिक फायदा फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तसेच उद्योगांना गती मिळू शकते. या उद्देशाने पर्यटनाला प्राधान्य देऊन व्यवसाय विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
रेवदंडा गावाला सुमारे तीन किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. हा समुद्र शांत व सुरक्षित पर्यटनासाठी असला तरी तेथे पोहोचण्यासाठी रस्ते रूंद असणे आणि स्वच्छता असल्यास पर्यटक तेथे थांबण्यास राजी असतो. भारतात रशियातून पहिला आलेल्या अफनासी निकेतन, शेषनाथ वाडेकर स्मारक ही ठिकाणे पर्यटकांना भुरळ घालणारी आहेत. पर्यटनाला चालना मिळण्याची गरजच नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

आध्यात्मिक पर्यटन
चौलमध्ये टेकडीवरील महालक्ष्मी मंदिर, तुलाडदेवी, महाराष्ट्रातील अनेकांची कुलदेवता असलेली शितळादेवी, भगवती, कालिका देवी आदी मंदिरे आहेत. रामेश्वर, मल्लेश्वव, सोमेश्वव, कुंडेश्वव ही शिवलिंगे पाहता आध्यात्मिक पर्यटन नक्कीच होऊ शकते. हिंगुलजा देवी कोरीव लेणी म्हणून अनेक जण अभ्यासाला येतात. पर्वतवासी भोवाळे दत्त मंदिरावरून चौल-रेवदंडा दोन्ही गावे हिरवा शेला पांघरलेली, तर समोरच चांदीसारखा समुद्र टिपण्यासाठी पर्यटक येतात. मात्र, पर्यटकांना येथे अनेक सुविधांची वानवा आहे.

रामेश्वव मंदिर, रेवदंडा मधील आगरकोट किल्ला

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80551 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top