विज्ञाननिष्ठ महाराष्ट्र विषयावर आज सुसंवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञाननिष्ठ महाराष्ट्र विषयावर आज सुसंवाद
विज्ञाननिष्ठ महाराष्ट्र विषयावर आज सुसंवाद

विज्ञाननिष्ठ महाराष्ट्र विषयावर आज सुसंवाद

sakal_logo
By

वाशी, ता. ३० (बातमीदार) : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने २१ व्या शतकातील विज्ञाननिष्ठ महाराष्ट्र या विषयावर सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. उद्या, (ता. १) सायंकाळी ५ वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सुसंवाद कार्यक्रम संपन्न होणार आहे.

भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुखपद भूषविलेले डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ देशाचे भविष्य असणाऱ्या युवा पिढीला व्हावा व विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी विचारमंथन व्हावे ही भूमिका नजरेसमोर ठेवून हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत. तसेच समाजातील वैज्ञानिक साक्षरता वाढून महाराष्ट्र राज्याच्या व भारत देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिशा मिळावी, या दृष्टीनेही हा सुसंवाद नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे, असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80560 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top