२९०० बालकांचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२९०० बालकांचे लसीकरण
२९०० बालकांचे लसीकरण

२९०० बालकांचे लसीकरण

sakal_logo
By

वाशी, ता. ३० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात मार्च ते मे २०२२ या कालावधीत विशेष मिशन इंद्रधनुष्य ४.० च्या तीन मोहिमांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील दोन मोहिमा पूर्ण झाल्या आहेत. यादरम्यान ७७२ गरोदर माता व २,८९८ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. आता या मोहिमेची तिसरी फेरी सोमवारपासून (ता. २ मे) राबविण्यात येत आहे.

बालकांमधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी साधन आहे. सर्वेक्षणात अर्धवट लसीकरण, तसेच लसीकरण न झालेली बालके लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात असे आढळून आलेले आहे. यामुळे लसीकरणापासून लसीकरण पूर्ण न झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे.

मिशन इंद्रधनुष्य या मोहिमेची प्रथम फेरी ७ मार्च ते १३ मार्च २०२२ व दुसरी फेरी ४ एप्रिल ते १० एप्रिलदरम्यान राबवण्यात आली. पहिल्या फेरीत एकूण ६५ सत्राद्वारे ३७८ गरोदर माता व १५६९ बालकांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले होते. या मोहिमेमध्ये एकूण ३८७ गरोदर मातांना व १,५२९ बालकांना लसीकरण करण्यात आले. सदर मोहिमेच्या दुसरी फेरीत एकूण ६९ सत्रांद्वारे ३७२ गरोदर माता व १,३२५ बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सदर मोहिमेमध्ये एकूण ३८५ गरोदर मातांना व १,३६९ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

१,१७४ बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट
तिसरी फेरी २ मे ते ९ मे २०२२ रोजी राबवण्यात येणार असून यासाठी ६२ बाह्यसत्रे व सहा मोबाईल सत्रे अशा एकूण ६८ सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. २९० गरोदर माता व १,१७४ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

नियमित लसीकरणांतर्गत अनेक लसी मोफत देण्यात येत असून प्रत्येक इंजेक्शनकरिता नवीन सिरिंज व नीडल वापरण्यात येते. तरी सर्व नागरिकांनी आपल्या पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80564 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top