तोतया पोलिसांने लुबाडले १ लाख ६१ हजाराचे दागिने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोतया पोलिसांने लुबाडले १ लाख ६१ हजाराचे दागिने
तोतया पोलिसांने लुबाडले १ लाख ६१ हजाराचे दागिने

तोतया पोलिसांने लुबाडले १ लाख ६१ हजाराचे दागिने

पनवेल : पोलिस असल्याची बतावणी करून एका भामट्याने पनवेलच्या करंजाडे भागात राहणाऱ्या व्यक्तीजवळचे १ लाख ६१ हजार रुपये किमतीचे दागिने लुबाडून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या घटनेतील तोतया पोलिसाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात लुबाडल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव अरविंद पोटे (६३) असे असून ते पनवेलमधील करंजाडे सेक्टर-५ मध्ये राहण्यास आहेत.

बुधवारी सकाळी पोटे हे स्कुटीवरून पनवेल येथे ब्लड रिपोर्ट आणण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सेक्टर-४-५ येथील क्रिकेट ग्राऊंडजवळ मोटारसायकलवरून आलेल्या एका तोतया पोलिसाने त्यांना अडविले. त्यानंतर त्यांचे खिसे तपासण्यास सुरुवात केली. त्यानंतर तोतयाने पोटे यांना अंगावरील दागिने काढण्यास सांगून त्यांच्याजवळ असलेल्या रुमालात काढून ठेवण्यास सांगितले. त्यानुसार पोटे यांनी सोन्याच्या कडा, सोन्याची अंगठी, चेन काढून ते रुमालात ठेवल्यानंतर तोतया पोलिसाने सदरचे दागिने रुमालात बांधून देण्याचा बहाणा करून त्यातील सर्व दागिने काढून घेतले. त्यानंतर गाठ मारलेला रुमाल पोटे यांच्या स्‍कूटीच्या डिकीमध्ये ठेवून पळ काढला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80569 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top