बनावट परवान्याच्या माध्यमातून एपीएमसी फळ मार्केटमध्ये तीन व्यापाऱ्यांवर गुन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट परवान्याच्या माध्यमातून एपीएमसी फळ मार्केटमध्ये तीन व्यापाऱ्यांवर गुन्हे
एपीएमसी फळ मार्केटमध्ये तीन व्यापाऱ्यांवर गुन्हे

बनावट परवान्याच्या माध्यमातून एपीएमसी फळ मार्केटमध्ये तीन व्यापाऱ्यांवर गुन्हे

नवी मुंबई : बनावट परवान्याच्या माध्यमातून एपीएमसीतील फळ मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विक्रम रामचंद्र हांडे, सय्यद युसूफ हुसेनी व सुनील बाबजी ढोले अशी या व्यापाऱ्यांची नावे असून त्यांनी सदरचे बनावट परवाने कुठून तयार करून घेतले, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी २२ एप्रिल रोजी एपीएमसी फळ मार्केटमधील मे. विक्रम हांडे, मे. मद्रास मँगो एजन्सी, तसेच मे. सुनील बाबजी ढोले या आस्थापनांची अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ अंतर्गत तपासणी केली होती. सदर तपासणीवेळी तिन्ही आस्थापनांनी त्यांच्याजवळ असलेले परवाने दाखविले होते. मात्र, सदरचे परवाने हे बनावट असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी पवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सदरचे परवाने खरे आहेत की बनावट आहेत, याबाबत शहानिशा करण्याबाबतचा अहवाल अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) रमेश जाधव यांच्याकडे दिला होता. त्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त रमेश जाधव यांनी सदरच्या तिन्ही आस्थापनांच्या परवान्याची ऑनलाईन अभिलेखाची तपासणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80573 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top