
केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या १७ यात्रेकरुंची फसवणूक
पनवेल, ता.३० (वार्ताहर): अज्ञात सायबर चोरट्याने मुंबईहून केदारनाथ येथे यात्रेसाठी जाणाऱ्या १७ व्यक्तींच्या हेलिकॉप्टरच्या प्रवासाचे बुकिंग करून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून सुमारे ८० हजारांची रक्कम लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
पनवेल तालुक्यातील सांगटोली गावात राहणारे धनंजय राख यांनी केदारनाथ यात्रेला जाण्याचे निश्चित केल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टर प्रवासाचे बुकिंग करायचे होते. त्यासाठी राख यांनी २१ एप्रिल रोजी गुगलवरून हेली सर्व्हीस या साईटवर जाऊन शोध घेतला असता, त्यांना हिमालयीन हेलिकॉप्टर सर्व्हीसेस, तसेच आकाश सिंग याच्या मोबाईल नंबरची माहिती मिळाली. त्यामुळे राख यांनी सदर नंबरवर संपर्क साधला. यावर भामट्या आकाश सिंग याने शिरसी ते केदारनाथदरम्यान १७ जणांसाठी प्रत्येकी ४,६८० रुपये अशी एकूण ७९,५६० रुपये लागतील असे सांगितले. तसेच सदर रक्कम पाठविण्यासाठी बँक खात्याची माहिती पाठवून देत प्रत्येकाचे आधार कार्ड मागवून घेतले. त्यानंतर राख यांनी तीन टप्प्यांत ७९,८६५ रुपये ऑनलाईन पाठवून दिले. मात्र, राख यांना त्याच्या बोलण्यावर संशय आल्याने त्यांनी जितकी रक्कम त्याला मिळाली, त्या रकमेचे हेलिकॉप्टरचे तिकीट पाठविण्यास सांगितले. मात्र भामट्या आकाश सिंग याने त्यांना तिकीट पाठवले नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80575 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..