अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खा.. पोटभर आंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खा.. पोटभर आंबा
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खा.. पोटभर आंबा

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खा.. पोटभर आंबा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्‍या अक्षय्य तृतीयाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून गेल्‍या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असलेल्‍या हापूसची पोटभर चव चाखता येणार आहे. एपीएमसी मार्केटमध्ये चार दिवसांमध्ये तब्बल चार लाखांहून अधिक आंब्याची आवक झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या वधारलेल्‍या भावात घसरण झाली आहे.
कोणत्याही नव्या कार्याची सुरुवात अथवा खरेदी करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधला जातो. घरात पूजा-अर्चा झाल्यानंतर शाकाहारी जेवणासोबत आमरस खाण्याची परंपरा असते. त्यामुळे या दिवशी आंबा खरेदीला जोर धरतो. याच दिवशी आंबा व्यापाऱ्यांकडूनही हापूसची पूजा करून व्यवसाय केला जातो. त्यामुळे एपीएमसीच्या मार्केटमध्ये कोकणातून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक वाढली आहे.
अवकाळी पावसामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात पुरेसा आंबा न आल्यामुळे विक्रीचा हंगाम व्यावसायिकांच्या हातातून गेला. सुरुवातीचा काळ आंबा व्यावसायिकांसाठी अडचणीचा गेला. आवक कमी असल्याने हापूस आंब्याचे भाव गगनाला भिडले होते. आंबे खरेदी परवडणारी नसल्याने बाजारात ग्राहकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे आंब्याला उठावही नव्हता. परंतु आता अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंब्याची आवक वाढल्याने हापूस खवय्यांना चव चाखता येणार आहे.
सध्या बाजारात देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागातून मोठ्या प्रमाणात हापूस आंबा येत आहे. तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतूनही आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये हापूस आंबा प्रति एक डझन २०० ते ५०० रुपये मिळत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये प्रति डझनाला शंभर रुपयांनी भाव खाली कोसळणार असल्याची शक्यता वाशी एपीएमसीच्या घाऊक फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे पुढील आठवडा हा हापूस आंबा खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ असेल.

दशकातील सर्वात मोठी आवक
अवकाळी पाऊस आणि फळमाशी अशा आसमानी संकटांमुळे गेले काही वर्षे हापूस आंबा संकटात सापडला आहे. हापूसच्या मागणीनुसार पुरवठा नसल्याने बागायतदार यासोबत व्यावसायिक अडचणीत सापडले होते. परंतु गेल्या दशकात आंबा आला नव्हता. एवढी आवक गेले चार दिवसांमध्ये झाली आहे. नऊ दिवसांत तब्बल ७ लाख २५ हजार १९९ आंब्याची आवक झाली आहे.


आंब्याची आवक
२९ एप्रिल - १ लाख १० हजार ४९१
३० एप्रिल - १ लाख १९ हजार ६५४
२८ एप्रिल १ लाख १३ हजार ९९
२६ एप्रिल १ लाख ८१२
२५ एप्रिल ९३ हजार २४२
२३ एप्रिल ८४ हजार ८२
२२ एप्रिल ७६ हजार ८१३
२१ एप्रिल ७४ हजार ९८६
२० एप्रिल ७१ हजार ६७४

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80584 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top