वसई विरारमध्‍ये अवयवदान जनजागृतीसाठी बाईक रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई विरारमध्‍ये अवयवदान जनजागृतीसाठी बाईक रॅली
वसई विरारमध्‍ये अवयवदान जनजागृतीसाठी बाईक रॅली

वसई विरारमध्‍ये अवयवदान जनजागृतीसाठी बाईक रॅली

sakal_logo
By

वसई, ता. ३० (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ वसई, द फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲण्ड बॉडी डोनेशन (इंडिया) व वसई-विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कामगार दिनानिमित्त (ता. १) सकाळी ७ ते ९.३० या वेळेत अवयवदान जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे, मुलुंड, घाटकोपर, दादर, भाईंदर या ठिकाणाहून बाईक रायडर्स ग्रुप या रॅलीत सहभागी होऊन अवयवदानाबाबत माहिती देणार आहेत. बाईक रॅली पापडी, माणिकपूर, अंबाडी रोड, एव्हरशाईन सिटी, तुळिंज, सोपारा गाव, उमराळे, बोळिंजमार्गे नवीन विवा कॉलेज- विरार या ठिकाणी ९.३० वाजता पोहोचेल. या कार्यक्रमास आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती अजीव पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80595 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top