नागरिकांच्या मागणीनुसार पाण्याचा टँकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकांच्या मागणीनुसार पाण्याचा टँकर
नागरिकांच्या मागणीनुसार पाण्याचा टँकर

नागरिकांच्या मागणीनुसार पाण्याचा टँकर

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : सिडको क्षेत्रातील खारघर आणि तळोजा नोडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने या भागात वारंवार पाण्याची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे या भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सिडकोच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनी टँकरच्या मागणीसाठी, तसेच पाणीपुरवठ्यासंदर्भात सिडकोकडे संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क, नैना शहर, महागृहनिर्माण योजना या प्रकल्पांमुळे दक्षिण नवी मुंबईतील खारघर आणि तळोजा नोडला वास्तव्यासाठी सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे या परिसरातील पाण्याच्या मागणीतही वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून खारघर आणि तळोजा या नोडमध्ये अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत.

सिडकोकडून हेटवणे पाणीपुरवठा योजनेसह नवी मुंबई महापालिका, एमआयडीसी यांच्यामार्फत पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु या परिसरातील सन २०५० पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून सिडकोकडून वाढीव पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे.


तक्रारीसाठी मोबाईल सेवा
सिडकोने नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी आणि टँकरची मागणी करण्यासाठी ९३२४९५०९४८ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर कॉल अथवा व्हॉटसअपद्वारे, एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. या मोबाईल क्रमांकावर खारघर आणि तळोजा परिसरातील नागरिक पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रार नोंदवू शकणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80598 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top