गाळामुळे बंधारे बुजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाळामुळे बंधारे बुजले
गाळामुळे बंधारे बुजले

गाळामुळे बंधारे बुजले

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ३ (बातमीदार) ः भीषण पाणीटंचाईचा सामना विक्रमगड तालुक्यातील नागरिकांना करावा लागतो आहे. विहिरी, ओहोळ कोरडे पडले आहेत. शिवाय पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेले बंधारेसुद्धा गाळाने बुजले आहेत. त्यामुळे प्रशासनाने पावसाळ्याआधी बंधाऱ्यातील गाळा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई दर वर्षी जाणवत असते. यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत असताना पाणीटंचाईच्या उपाययोजनांकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे.
मे महिना सुरू असल्याने तालुक्यातील अनेक नदी, नाले, ओहोळ कोरडे पडले आहेत. त्यामधील बंधाऱ्याचे पाणीही कमी झाल्याने गाळ काढणे शक्य होणार आहे.

तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाऊस सुरू होण्याअगोदर तालुक्यातील नदी, नाले, ओहळ यांच्यामधील बंधाऱ्यातील गाळ काढायला हवा. जेणे करून बंधाऱ्याचा पाणीसाठ्यामध्ये वाढ होईल.
- सोपान दिघे, सामाजिक कार्यकर्ता, विक्रमगड

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80620 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top