
गरजवंताच्या मदतीसाठी धाव घ्या
बेलापूर, ता. ७ (बातमीदार) : भारतातील मदतीसाठी पात्र आहेत, अशा गरीब लोकांपर्यंत वकिलांनी पोहोचले पाहिजे. कायदेशीर मदत घेण्याच्या बाबतीत अनेकदा गैरसोय होते, अशांना मदत केली पाहिजे. नवी मुंबईतील गरीब आणि पात्र लोकांना कायद्याचे योग्य मार्गदर्शन आणि आधार मिळेल, असे प्रतिपादन फादर सेटनिर्नो आल्मेडा यांनी केले. ॲग्नेल स्कूल ऑफ लॉमधील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ नुकताच महाविद्यालयाच्या मूट कोर्ट हॉलमध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते.
प्राचार्य केविन टोरो यांनी तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करा. आपल्या समाजातील गरजू आणि उपेक्षित वर्गाला न्याय देण्यासाठी निष्ठा आणि न्यायासाठी धोका पत्करण्याची तयारी असावी, असे त्यांनी म्हटले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संदीप मारणे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी मराठी माध्यमाच्या शाळेपासून आजपर्यंतचा जीवन प्रवास सांगितला. नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त डॉ. अमरीश पटनिगेरे, ॲग्नेल सेवा संघाचे व्यवस्थापकीय संचालक रेव्ह. सेटनिर्नो आल्मेडा, सेंटर फॉर इंक्युबेशन अँड बिझनेस एक्सेल रेशनचे सीईओ प्रसाद मेनन, प्राचार्य केविन टोरो, प्राध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80680 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..