फास्ट टॅग अभावी वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फास्ट टॅग अभावी वाहतूक कोंडी
फास्ट टॅग अभावी वाहतूक कोंडी

फास्ट टॅग अभावी वाहतूक कोंडी

sakal_logo
By

दीपक घरत : सकाळ वृत्तसेवा

पनवेल, ता. ३ : सायन-पनवेल महामार्गावरील कोपरा-कामोठे टोलनाक्यावर फास्ट टॅगची सुविधा सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीए) दिले आहे; मात्र आता आठ महिने उलटल्यानंतरही कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी या टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहतूकदार, अवजड वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सायन - पनवेल महामार्गावरून प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना मुंबईच्या दिशेने जाताना कोपरा येथे, तर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी कामोठे येथे टोलानाके उभारण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी लहान, हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. मात्र एमएसआरडीएने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलनाक्यांवर फास्ट टॅगची अंमलबजावणी करण्यात न आल्याची दखल घेतली आहे. त्यानुसार टोल कंत्राटदारांना मागील वर्षी नोटीस बजावून ऑगस्ट २०२१ पर्यंत सुविधा सुरू न केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. मात्र आता आठ महिने उलटल्यानंतर फास्ट टॅग सुरू न केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारने राज्यातील सर्व टोल नाक्यांवर फास्ट टॅगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चालकांनी आपल्या वाहनांवर फास्ट टॅग बसवून घेतले आहेत. मात्र सायन-पनवेल महामार्गावर अद्याप फास्ट टॅग सेवा सुरू न झाल्याने चालकांकडून टोलच्या स्वरूपात रोख रक्कम स्वीकारली जाते. या प्रक्रियेमुळे विलंब होत असल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.


टोलनाक्यावर फास्ट टॅगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन वाहनचालकांना होणारा त्रास बंद होईल.
- योगेश चौधरी, व्यवस्थापक, टोल प्लाझा

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80693 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top