
उरणमध्ये लाभार्थ्यांना दीड कोटी रुपयांची मदत
उरण, ता. ७ (वार्ताहर) : सरकारच्या गोरगरिबांसाठी असणाऱ्या विशेष साह्य योजनेंतर्गत विविध योजनांचा लाभ उरण तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी घेतला आहे. तालुक्यातील १,३५६ लाभार्थ्यांना वर्षभरात एक कोटी ६२ लाख रुपये रक्कम वाटप करण्यात आली.
तालुक्यातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ७९४ लाभार्थी, श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजना गट अ १२२ लाभार्थी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेचे १३८ लाभार्थी, इंदिरा गांधी विधवा निवृत्तिवेतन योजनेचे २२ लाभार्थी, अशा सर्व योजनांतून एकूण १,३५६ लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.
उरण तालक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील अक्कदेवी वाडीवरील मीना सुनील कातकरी, दर्शना चंद्रकांत कातकरी यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून प्रत्येकी वीस हजार रुपयांचा धनादेश नायब तहसीलदार संदीप खोमणे यांच्या हस्ते देण्यात आला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80700 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..