पशू-पक्ष्यांना झाडांच्या सावलीचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पशू-पक्ष्यांना झाडांच्या सावलीचा आधार
पशू-पक्ष्यांना झाडांच्या सावलीचा आधार

पशू-पक्ष्यांना झाडांच्या सावलीचा आधार

sakal_logo
By

रोहा, ता. ३ (बातमीदार) : दिवसेंदिवस उन्हाच्या झळा अतिशय तीव्र होत चालल्याने आहेत. इतर पशू-पक्षीही उन्हाच्या तडाख्याने हैराण झाले आहेत. उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक जण गारव्याच्या शोधात आहे. मात्र, मुक्या जनावरांना मोठ्या झाडांच्या सावलीचा आधार आणि पाण्या डुंबण्याचा आधार फार दिलासादायक ठरत आहे.
राज्यात या वर्षी तापमानात मोठी वाढ झाली आहे. वाढणाऱ्या तीव्र उष्णतेचा दैनंदिन जनजीवनावरही चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहेत. या वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळेस घराबाहेर न पडणे, शीतपेयांचे सेवन करणे, आहारात थंड पदार्थांचे सेवन करणे, सुती कपडे वापरणे, उन्हात फिरताना टोपी व गॉगलचा वापर करणे आदी बाबींवर प्रत्येकाकडून भर दिला जात आहे. पशू-पक्षीही दुपारच्या सुमारास झाडांच्या सावलीचा आधार तर मनसोक्तपणे पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत आहेत.
पावसाळा सुरू व्हायला अजून दीड महिन्याचा कालावधी आहे. त्यानंतर मात्र वातावरणात गारवा निर्माण होईल. तोपर्यंत प्रखर उष्णतेचा सामना प्रत्येकाला करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत वाढत्या उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रखर उन्हात फिरू नये, जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करणे, शिळे अन्न खाऊ नये, पुरेशी झोप घेणे, थकवा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आदी नियम पाळण्याचा सल्ला तज्‍ज्ञ डॉ. महेंद्र म्हात्रे यांनी दिला आहे.

रोहा : वाढत्या उष्णतेचा त्रास सहन होत नसल्याने झाडाच्या सावलीखाली ठिय्या मांडलेला गुरांचा कळप.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80745 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top