
महापालिकेचे नवीन प्रसाधनगृह बंद
नेरूळ, ता. ३ (बातमीदार) : नेरूळमधील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे महापालिकेने नवीन प्रसाधनगृह उभारले आहे; परंतु अद्याप ते सुरू केले नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईमधील विरंगुळ्याच्या महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये ज्वेल्स ऑफ नवी मुंबईचा समावेश आहे. पाच हजारांपेक्षा जास्त नागरिक प्रतिदिनी या परिसराला भेट देत असतात. सकाळी व सायंकाळी येथील जॉगिंग ट्रॅकवर गर्दी असते. महापालिकेने यापूर्वी एका ठिकाणी प्रसाधनगृह सुरू केले होते. मात्र तीन किलोमीटर लांबीच्या ट्रॅकवर एकच प्रसाधनगृह असल्यामुळे नागरिकांनी अजून एक प्रसाधनगृह सुरू करावी, अशी मागणी केली होती. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या सूचनेची दखल घेऊन मैदानाच्या बाजूला प्रसाधनगृह उभारले आहे; पण अद्याप ते सुरू केले नाही. लवकर ते सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80810 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..