एमआयडीसीमध्ये कचऱ्याची घरघर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयडीसीमध्ये कचऱ्याची घरघर
एमआयडीसीमध्ये कचऱ्याची घरघर

एमआयडीसीमध्ये कचऱ्याची घरघर

sakal_logo
By

वाशी, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. देशात एकीकडे महापालिका लौकिक मिळवत असताना ठाणे, बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांमधील कचरा उचलला जात नाही. त्यामुळे परिसरातील कंपन्यांच्या आवारात कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. तसेच कचराकुंड्या नसल्यामुळे हा कचरा जाळण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

एमआयडीसी परिसरामधील रबाले, तुर्भे, महापे, पावणेगाव परिसरात कचऱ्यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधीचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचा प्रश्न उद्‍भवत आहे. औद्योगिक पट्ट्यातील कारखानदार महापालिकेला ६०० ते ७०० कोटी रुपयांचा कर भरतात. मात्र पालिका कचरा उचलण्यासारखी पायाभूत सुविधा या कारखानदारांना पुरवत नाही, अशी कंपनीच्या मालकांची ओरड आहे. पालिका सुविधा देत नसल्याने व्यापारी रस्त्यावरच हा कचरा जाळून, तर काही जण गटारामध्ये टाकून त्यांची विल्हेवाट लावतात. कचऱ्यासह औद्योगिक क्षेत्रामध्ये सार्वजनिक शौचालय नसल्याने कर्मचाऱ्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अधिकाऱ्यांकडून चालढकलपणा
कचरा जाळण्यात येत असल्यामुळे त्यांच्या धुरामुळे व येणाऱ्या वासामुळे कामगार त्रस्त झाले आहेत. एमआयडीसीने कचऱ्याचा संबंध हा पालिकेचा असून कारखानदार पालिकेला कर भरत असल्याने त्यांनीच कचरा उचलावा, असे उत्तर देत हात झटकले असल्याने कचऱ्याचा प्रश्न अंधातरीत राहिला आहे.

औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांचा कचरा उचलण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाची नसून महापालिकेची आहे.
- आर. जी. राठोड,
कार्यकारी अभियंता, एमआयडीसी.

एमआयडीसी परिसरात कचरा हा नियमित उचलला जातो. जर कोणी कचरा जाळत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
- बाबासाहेब राजळे,
उपआयुक्त, नवी मुंबई महापालिका.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80825 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top