साठ वर्षातील लोकप्रतिनिधींची माहिती मागासवर्गीय आयोगाला सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साठ वर्षातील लोकप्रतिनिधींची माहिती मागासवर्गीय आयोगाला सादर
साठ वर्षातील लोकप्रतिनिधींची माहिती मागासवर्गीय आयोगाला सादर

साठ वर्षातील लोकप्रतिनिधींची माहिती मागासवर्गीय आयोगाला सादर

sakal_logo
By

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातील गेल्या साठ वर्षांतील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची माहिती राज्य मागासवर्गीय आयोगाला सादर करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षणप्रकरणी ही माहिती आयोगाला देण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यासाठी १९६० पासूनची मिरा-भाईंदरमधील तत्कालीन ग्रामपंचायत, नगर परिषद आणि आताच्या पालिकेतील नगरसेवकांची माहिती सादर करण्याचे आदेश मिरा-भाईंदर पालिकेला देण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने महापालिकेकडे असलेली नोंद तसेच सर्वेक्षण करून ही माहिती गोळा केली. यात प्रत्येक वेळी निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांची संख्या, त्यांची जात याची माहिती गोळा करण्यात आली. जी माहिती महापालिकेकडे नव्हती, ती संबंधित व्यक्तींची अथवा त्यांच्या नातेवाईकांची गाठभेट घेऊन गोळा करण्यात आली. ही माहिती महापालिकेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केली. त्यानंतर ती राज्य मागासवर्गीय आयोगाकडे पाठवण्यात आली, अशी माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80832 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top