घराघरांत हिरकणी जन्माला यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घराघरांत हिरकणी जन्माला यावी
घराघरांत हिरकणी जन्माला यावी

घराघरांत हिरकणी जन्माला यावी

sakal_logo
By

पनवेल, ता. ३ (बातमीदार) : हिरकणीचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे हिरकणी नाव घेतल्यानंतर डोळ्यासमोर उभा राहतो तो गड आणि गडावरून खाली उतरणारी हिरकणी. अशाच शूर आणि निर्भय असलेल्या कर्तबगार महिलांचा हिरकणी पुरस्काराने होणारा गुणगौरव हा सर्वच स्त्रीवर्गाचा अभिमान आहे. त्यामुळे घराघरांत कर्तबगार आणि शूर हिरकणी जन्माला यावी, असे प्रतिपादन उद्योजक शिवरनत मुंदडा यांनी केले.

जालना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अष्टभुजा हिरकणी आणि उज्ज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यातील कर्तबगार महिलांचा विविध हिरकणी पुरस्काराने गुणगौरव करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन सामाजिक कार्यकर्त्या रसना देहेडकर यांच्या हस्ते झाले. या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवरतन मुंदडा, डॉ. कैलाश सचदेव, अ‍ॅड. अश्विनी धन्नावत, सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे, रोटरी क्लबचे अ‍ॅड. महेश धन्नावत, अष्टभुजा हिरकणीच्या करुणा मोरे, रायगड येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीता ढेरे, विद्या निकाळजे, दीपक खाडे उपस्थित होते. या वेळी महिलांसाठी होम मिनिस्टरसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

पनवेल, अलिबागमधील महिलांचा सत्कार
राज्यातील महिला, मुली यांना मासिक पाळीविषयी आरोग्याचे धडे देणाऱ्या पनवेल येथील शैला खाडे, हिंगोली येथील अनाथ बालकास स्तनपान करून संगोपन करणाऱ्या कॉन्स्टेबल सलमा शेख, रायगडमधील आदिवासी महिलांसाठी दिवसरात्र कार्य करणाऱ्या सुमन तोरणे, मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे देत स्वावलंबी करणाऱ्या अलिबाग येथील तपस्वी श्रीमाळी यांचा स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80849 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top