मुंबईत मराठी पाट्यांचा नियम धाब्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathi language
मुंबईत मराठी पाट्यांचा नियम धाब्यावर

मुंबईत मराठी पाट्यांचा नियम धाब्यावर

वाशी - राज्य सरकारने (State Government) दुकाने (Shops) आस्थापनांच्या नावाच्या पाट्या (Name Board) या मराठीत (Marathi) ठळक व मोठ्या अक्षरांत असणे, बंधनकारक केले आहे. त्यावर उच्च न्यायालयानेसुद्धा (High Court) शिक्कामोर्तब केले आहे; मात्र नवी मुंबईत हा नियम धाब्यावर बसविण्यात आला आहे.

राज्यात दुकाने आणि आस्थापनांच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेत असणे, बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरी नवी मुंबई शहरात मात्र बहुतांशी व्यापाऱ्यांना मराठी भाषेचे वावडे असल्याचे दिसून आले आहे. कारण शहरातील दुकाने व आस्थापनांच्या पाट्यांवर इतर भाषेतील अक्षरे मोठी, तर मराठीची अक्षरे अगदी लहान आहेत. काहींनी तर नावाच्या पाटीवर मराठीला स्थानच दिले नसल्याचे दिसून आले आहे.

आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

काही दुकानदार आणि आस्थापनांनी इंग्रजीबरोबरच मराठीही अक्षरे कोरली आहेत; परंतु मराठी अक्षरे अगदी लहान असल्याने ती सुस्पष्ट दिसत नाहीत. मराठी नावाच्या पाट्या ठळक व मोठ्या अक्षरात लिहिण्याच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे दिसून आले आहे.

मनसेचा आंदोलनाचा इशारा

महानगरपालिकेने नवी मुंबई शहरात दुकाने व आस्थापनांनी मराठीमध्ये पाट्या न केल्यास मनसे स्टाईलने खळ्ळखट्याक करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नीलेश बाणखेले यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80853 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MumbaiMarathi Language
go to top