वाशीतील टॉय ट्रेन बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशीतील टॉय ट्रेन बंद
वाशीतील टॉय ट्रेन बंद

वाशीतील टॉय ट्रेन बंद

sakal_logo
By

तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : शाळांना उन्हाळी सुटी लागल्याने शहरातील उद्याने, मैदानांमध्ये बच्चेकंपनीची गर्दी वाढू लागली आहे. उद्यानातील खेळण्यांवर बच्चेकंपनीच्या रांगा लागू लागल्या आहेत. अशातच वाशीतील मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेन बंद असल्याने मुलांना हिरमोड होत आहे. काही महिन्यांपासून बंद झालेली ट्रेन उन्हाळी सुटी लागली, तरी सुरू झालेली नाही. त्यामुळे मुले निराश होऊन परतत आहेत.

पालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने काही मोजक्या उद्यानांत टॉय ट्रेन बसवण्यात आल्या आहेत. त्यात नेरूळ, वाशी आणि ऐरोलीमधील उद्यानांचा समावेश आहे. लहान मुलांकडून या ट्रेन राईडला मोठा प्रतिसाद मिळत असतो. पावसाळ्यात या सर्व ठिकाणच्या ट्रेन बंद ठेवण्यात येतात. पावसाळा संपला, की ट्रेन सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र ट्रेनच्या डागडुजीकडे लक्ष दिले जात नसल्याने उन्हाळी सुटी लागल्यावरही टॉय ट्रेन सुरू होत नाहीत. सध्या नेरूळमधील वंडर्स पार्कमधील टॉय ट्रेन सुरू आहे. मात्र वाशीतील ट्रेन बंदच आहे. या ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाला असून दुरुस्तीनंतर ती सुरू होऊ शकेल, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र यामुळे लहान मुलांचा मात्र हिरमोड होत आहे.

सुटीच्या दिवशी गर्दी
मीनाताई ठाकरे उद्यानातील मिनी ट्रेन ही ५ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी आहे. एका राईडसाठी तिकीट हे कमी असल्याने ते सर्वांना परवडण्यासारखे आहे. म्हणून येथे मुलांच्या रांगा लागलेल्या असतात. दर शनिवारी व रविवारी सहाशे ते सातशे मुले या सफरीचा आनंद घेत होते. तर इतर दिवशी मुलांची संख्या २०० ते ३०० च्या घरात असते. मात्र ट्रेनच बंद असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ही ट्रेन लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी पालक आणि बच्चे कंपनी करत आहेत.

काही तांत्रिक अडचणी असून त्याची सेवा दुरुस्तीसाठी बंद आहे. तसेच याबाबत अधिक माहिती उद्यान विभागाकडून घेतली जाईल.
- सुखदेव येडवे, सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी, वाशी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80854 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top