
मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना निरोप
कांदिवली, ता. ३ (बातमीदार) ः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभ सायली महाविद्यालय बोरिवली येथे उत्साहात पार पडला.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रियदर्शनी शैक्षणिक आणि सामाजिक विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष आशीर्वाद लोखंडे आणि सहसचिव प्रतिमा गरूड तसेच डॉ. वामन नाखले, डॉ. प्रज्ञा लोखंडे, वाहतूक पोलिस निरीक्षक आवटे आणि अभिनेता प्रदीप कबरे उपस्थित होते. जीवनात सकारात्मकता आणण्याची शपथ प्रदीप कबरे यांनी विद्यार्थ्यांना दिली. ‘आम्ही सकारात्मक विचार करू’ या सांघिक घोषणेने सभागृह दणाणून गेले. आवटे यांनी जिद्द आणि चिकाटीने आपण कसे यश प्राप्त करू शकतो हे सांगून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. नाखले यांनी विद्यार्थ्यांसाठी आणखी नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणात आशीर्वाद लोखंडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80895 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..