उष्माघातामुळे ठाण्यात तीन प्राणी दगावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उष्माघातामुळे ठाण्यात तीन प्राणी दगावले
उष्माघातामुळे ठाण्यात तीन प्राणी दगावले

उष्माघातामुळे ठाण्यात तीन प्राणी दगावले

sakal_logo
By

ठाणे, ता. ३ (बातमीदार) : मार्च महिन्यापासूनच ठाणे जिल्ह्यात उष्णतेचा पारा नवनवीन उच्चांक गाठत आहेत. या उन्हात नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत असतानाच प्राण्यांनाही उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. ठाणे शहरात १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत तब्बल ३१ प्राण्यांना या उष्माघाताचा त्रास झाला असून यातील तीन प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे शहरातील एसपीसीए या संस्थेच्या पशू रुग्णालयात एप्रिल महिन्यात या ३१ प्राण्यांना दाखल करण्यात आले असून यात २३ श्वान आणि ८ मांजरींचा समावेश आहे; तर उष्णतेच्या त्रासामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये दोन श्वान आणि एका मांजरीचा समावेश आहे. ठाणे शहरात मार्च महिन्यापासून तापमानाने ४० अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर संपूर्ण एप्रिल महिन्यात क्वचितच तापमान ४० च्या खाली नोंदवण्यात आले असून अन्यथा संपूर्ण महिना ठाणेकरांना ४० अंश सेल्सियस तापमानापेक्षा अधिकच्या उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. उष्माघाताची झळ बसलेल्या प्राण्यांमध्ये काही पाळीव तसेच पदपथांवरील भटक्या प्राण्यांचाही समावेश आहे. प्राण्यांप्रमाणेच ठाणे शहरातील १६ पक्षांनाही या उष्माघाताचा फटका बसला आहे. उष्माघाताचा त्रास झालेल्या प्राण्यांवर योग्य औषधोपचार करून त्यांना प्राणी रुग्णालयातून सोडण्यात आल्याचे डॉ. सुहास राणे (पशू वैद्य) यांनी सांगितले.

उन्हाळ्यात अशी घ्या प्राण्यांची काळजी
उन्हाचा तडाखा वाढत असल्याने सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत पाळीव प्राण्यांना बाहेरील वातावरणात नेणे टाळावे. उन्हाळ्यात प्राण्यांना डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीकरणाची समस्या जाणवते, तेव्हा उन्हाळ्याच्या ऋतूत प्राण्यांना पिण्यासाठी पाणी देण्याचे प्रमाण वाढवावे. त्यांना पाण्यातून ग्लुकाँडी पावडर यांसारखे पदार्थ टाकून द्यावेत. तसेच जेवणात आठवड्यातून तीन ते चार वेळा प्राण्यांना दूधभात, ताक यांसारखे शरीराला थंड असणारे पदार्थ खायला द्यावेत. उष्माघाताचा त्रास झाल्यास प्राण्यांच्या डोक्यावर थंड बर्फाने शेक द्यावा. प्राण्यांना आठवड्यातून दोनदा आंघोळ घालावी. तसेच काही परदेशी प्रजातीच्या प्राण्यांना अधिक उन्हाची सवय नसल्याने त्यांना घरातील एसीच्या थंड वातावरणात ठेवावे. तसेच प्राणी अगदीच अशक्त होत असल्यास पशू वैद्यांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. सुहास राणे (पशू वैद्य) यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80918 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top