
आरक्षित जमिनी विकसासाठी जमीन मालकांनी पुढाकार घ्यावा
कल्याण, ता. ३ (बातमीदार) ः कल्याण-डोंबिवली नगरी, सुंदर व सुनियोजित करण्याकरिता आपल्या आरक्षित जमिनी विकसित करण्याकरिता संबंधित जमीनमालकांनी पुढे येऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे .
कल्याण डोंबिवली पालिकेच्या मंजूर विकास योजनेमध्ये एकूण १७१७ आरक्षणे (सेक्टर १ ते ७ मधील १२१२ व २७ गावांमधील ५०५) असून आरक्षणांचे प्रयोजन हे महापालिका क्षेत्रामधील रहिवासी, नागरिक यांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे असून आरक्षणांपैकी साधारणत: ५१३ म्हणजे ४० टक्के आरक्षणे हस्तांतरणीय विकास हक्क(टी.डी.आर.) च्या मोबदल्यात तसेच समावेशक आरक्षणाच्या धर्तीवर विकासातून महापालिकेला प्राप्त झालेली आहेत. उर्वरित आरक्षणे सरकारने नव्याने मंजूर केलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे विकास करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
एखादा आरक्षित भूखंड पालिकेला देऊ करावयाचा असल्यास त्या बदल्यात संबंधितांस २.०५ चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) स्वरूपात मिळतो. त्यामुळे एखाद्या नागरिकाचा जमिनीवर आरक्षण असल्यास नागरिक आपल्या जमिनीचा विकास करू शकतो. त्यामुळे कल्याण डोंबिवली नगरी, सुंदर व सुनियोजित करण्याकरीता आपल्या आरक्षित जमीन विकसित करण्याकरिता संबंधित जमीनमालकांनी पुढे येऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80919 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..