बेलवली भुयारी मार्गाची ग्रामस्थांकडून डागडुजी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेलवली भुयारी मार्गाची ग्रामस्थांकडून डागडुजी!
बेलवली भुयारी मार्गाची ग्रामस्थांकडून डागडुजी!

बेलवली भुयारी मार्गाची ग्रामस्थांकडून डागडुजी!

sakal_logo
By

बदलापूर, ता. ३ ः गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे व पालिका प्रशासन यांच्या कचाट्यात अडकून पडलेल्या बेलवली येथील भुयारी मार्गातील दुरवस्था झाली होती. यासंदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील या रस्त्याची दुरुस्त होत नसल्याने अखेर येथील ग्रामस्थांनी मिळून स्वखर्चातून या मार्गाची तात्पुरती डागडुजी करून घेतली आहे.
बदलापूर पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुलावर रोजच मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या उड्डाणपुलाखेरीज दुसरा पर्यायी मार्ग असणाऱ्या बेलवली भागातील भुयारी मार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली होती. अनेक दुचाकीस्वारांना या ठिकाणी छोटे-मोठे अपघात झाले होते. या ठिकाणी पाणी भरण्याचे अनेक स्रोत जोडले गेले असल्याने या ठिकाणी सतत पाणी साचते. त्यात पावसाळ्यात तर पाण्याची पातळी ही चार ते पाच फुटापर्यंत असते. त्यामुळे पर्यायी मार्ग असतानाही गेल्या अनेक वर्षांपासून पाणी साचत असल्या कारणाने येथील नागरिक व ग्रामस्थांनी हा मार्ग दुरुस्त करण्यासाठी अनेक आंदोलने व पत्रव्यवहार केले. मात्र, अनेक वर्षे हा मार्ग पालिका हद्दीत नाही, तर रेल्वेच्या हद्दीत असल्याचे सांगून पालिका कामात दिरंगाई करत होती. रेल्वे प्रशासनसुद्धा याकडे लक्ष देत नव्हते. अखेर येथील ग्रामस्थांनी स्वखर्चातून हा मार्ग दुरुस्त करण्याचे ठरवले.

२५ हजारांचा निधी गोळा
ग्रामस्थांनी २५ हजाराचा निधी गोळा करून अखेर या मार्गाची तात्पुरती डागडुजी केली. या उपक्रमात किशोर पाटील, अशोक सोनावळे, नंदू कराळे, सुदाम कराळे, अविनाश देशमुख, तुषार साटपे, भारत पाटील, गणेश भोपी आदी ग्रामस्थांनी यात सहभाग घेतला. दरम्यान, स्थानिक प्रशासनानेसुद्धा लवकरच या मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करणार असल्याचे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80924 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top