वडपे-भिनार रस्त्याची दुरुस्ती करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडपे-भिनार रस्त्याची दुरुस्ती करा
वडपे-भिनार रस्त्याची दुरुस्ती करा

वडपे-भिनार रस्त्याची दुरुस्ती करा

sakal_logo
By

पडघा, ता. ३ (बातमीदार) ः भिवंडी तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या वडपे-भिनार रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. हा रस्ता पूर्णपणे अखडला आहे. त्यामुळे येथून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, तर येथे मोठा अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती प्रकाश भोईर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
वडपे ते भिनार हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भिवंडी पंचायत समितीचे सभापती प्रकाश भोईर यांनी वडपा बायपास ते भिनार या खराब रस्त्याच्या कामासंदर्भात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिले. या निवेदनानंतर सोमवारी (ता.२) भिनार येथे खराब रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता चौधरी यांच्यासह भोईर यांनी पाहणीसुद्धा केली. यावेळी शिवसेना तालुका सचिव राजेंद्र काबाडी, उपतालुकाप्रमुख अंनता पाटील, सचिन भोईर जिल्हा परिषद गट सचिव, विभागप्रमुख रामदास गुळवी भिनार शाखाप्रमुख तानाजी भोईर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80926 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top