
केडीएमटीची प्रवाशांना स्मार्ट सेवा मिळणार
कल्याण - केडीएमटीकडून (KDMT) आता प्रवाशांना (Passenger) स्मार्ट सेवा (Smart Service) मिळणार आहे. प्रवाशांना ॲप (App) आणि ऑनलाईन पद्धतीने तिकीट (Online Ticket) उपलब्ध होणार आहे.
शिवाय बस नेमकी कुठे आहे, याची माहितीदेखील एव्हीएलएस या ॲपवर प्रवाशांना मिळणार आहे. विशेष म्हणजे बसचे भाडे कमी होणार आहे. तसा प्रस्ताव केडीएमटीने सरकारला पाठवला आहे. यामध्ये एसी बस ४५ टक्के आणि साधी बसचे भाडे १० टक्यांनी कमी होणार आहे. सरकारची परवानगी मिळताच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती केडीएमटीचे उपव्यवस्थापक संदीप भोसले यांनी दिली.
प्रवाशांना अधिक चागंल्या प्रकारे सेवा देता यावी म्हणून केडीएमटीकडून अनेक योजना आखण्यात येतात. या योजनांची योग्य अंमलवबाजवणी अधिकारी करत असतात. बस वेळेवर येत नसल्याची अनेकदा तक्रार प्रवासी करतात. त्यामुळे आता एव्हीएलएस (ॲटोमॅटिक व्हेइकल लोकेशन सिस्टीम) या मोबाईल ॲपद्वारे बसचे नेमकी कुठे आहे, याची नेमकी माहिती प्रवाशांना कळणार आहे. शिवाय ४० बस स्टॉपवर तेथे येणाऱ्या बसचे बसची वेळ नोंदवण्यात येणार आहे.
बसमध्ये प्रवाशांना पुढील स्टॉपबाबत उद्घोषणा होणार आहे. आणीबाणीच्या स्थितीमध्ये बसचालक बसमधील पॅनिक बटन दाबून कमांड सेंटरला घडलेल्या घटनेबाबत माहिती देऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
कंट्रोल बोर्डद्वारे बसवर लक्ष
केडीएमटीच्या व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांच्या दालनात कंट्रोल बोर्ड बसविण्यात आला आहे. या कंट्रोल बोर्डावर डेपोमधून सुटलेली बस कोणत्या रस्त्यावर धावत आहे. बसचे उत्पन्न किती, याची क्षणा-क्षणाला माहिती मिळत आहे. या कंट्रोल बोर्डमुळे कामचुकार कर्मचारीवर्गावर वचक बसेल, असे सांगण्यात येत आहे.
२०७ इलेक्ट्रॉनिक बस लवकरच ताफ्यात
राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून केडीएमटीच्या ताफ्यात २०७ इलेक्ट्रॉनिक बस लवकरच दाखल होणार आहेत. यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात १२ ठेकेदारांनी सहभाग घेत ४ ठेकेदारांनी निविदा भरल्या असून लवकरच पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार केडीएमटी व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपपरिवहन व्यवस्थापक संदीप भोसले यांच्या टीमने पुन्हा केडीएमटी पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत असून सध्या प्रतिदिन अडीच लाखाचे उत्पन्न प्राप्त होत आहे.
प्रवासी भाडे कमी होणार
केडीएमटीने शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून प्रवासी टप्पेनिहाय एसी बसेस ४५ टक्के आणि बिनाएसी बसचे भाडे १० टक्के कमी करण्याचा प्रस्ताव पाठविला असून त्याला मंजुरी मिळताच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती उपव्यवस्थापक संदीप भोसले यांनी दिली.
कोरोनाकाळानंतर केडीएमटी पूर्वपदावर येत आहे. काळानुसार पालिका, केंद्र, राज्य सरकारच्या निधीमधून प्रवाशांना स्मार्ट सेवा देण्याचा मानस आहे. आगामी काळात निश्चित केडीएमटीचे उत्पन्न वाढेल.
- डॉ. दीपक सावंत, व्यवस्थापक, केडीएमटी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80938 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..