नोकरीच्या अमिषाने फसवणूक करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोकरीच्या अमिषाने फसवणूक करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा
नोकरीच्या अमिषाने फसवणूक करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

नोकरीच्या अमिषाने फसवणूक करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ३ (बातमीदार) ः रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस आणि हेल्परच्या नोकरीचे प्रलोभन दाखवून १३ जणांकडून ५९ लाख रुपये उकळणाऱ्या सुशीला देशवारे (६०) या महिलेविरोधात शिवाजीनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक येथील जगदीश चौधरी यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. देशवारे यांनी ऑगस्ट २०१८ ते १० जानेवारी २०२२ या कालावधीत मयूर चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, चेतन चौधरी, राहुल रमेश चौधरी, जगदीश वाघ, संदीप शेलार, राहुल राजेंद्र चौधरी, गणेश चौधरी, धनंजय ठाकरे या सर्वांकडून रेल्वेत नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून ५९ लाख रुपये उकळल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80939 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top