जागा खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवत महिलेची २० लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागा खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवत महिलेची २० लाखांची फसवणूक
जागा खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवत महिलेची २० लाखांची फसवणूक

जागा खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवत महिलेची २० लाखांची फसवणूक

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ३ ः डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात जागा खरेदी करून देतो, असे सांगत ४८ वर्षीय महिलेची दोघा भामट्यांनी २० लाखाला फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात महेश भापकर व गणेश भापकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेत एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या सुरेखा देशमुख यांना महेश व गणेश यांनी एमआयडीसी निवासी भागात जागा खरेदी करून देतो, असे सांगितले. २०१९ पासून ते आत्तापर्यंत त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून २० लाख रुपये धनादेशाद्वारे घेतले; परंतु त्यानंतर ना जागा दिली, ना पैसे परत केले, त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरेखा यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80942 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top