मनोर परिसरात ईद उल फित्र मोठ्या उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनोर परिसरात ईद उल फित्र मोठ्या उत्साहात
मनोर परिसरात ईद उल फित्र मोठ्या उत्साहात

मनोर परिसरात ईद उल फित्र मोठ्या उत्साहात

sakal_logo
By

मनोर, ता. ३ (बातमीदार) ः मनोर परिसरातील मुस्लिम बांधवांकडून मंगळवारी (ता. ३) रमझान ईद(ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा प्रथमच निर्बंधमुक्त ईद साजरी होत असल्याने मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मनोर परिसरातील मशिदींमध्ये ईदनिमित्ताने होणारी विशेष नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या वेळी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना गुलाबाचे पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
मनोर, टेन, टाकवाहाल, काटाळे, सोनावे आणि दहिसरतर्फे मनोर गावातील मुस्लिम वस्तीत मोठ्या उत्साहात निर्बंधमुक्त रमजान ईद साजरी करण्यात आली. सकाळी सामूहिक नमाज अदा केल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’ म्हणत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मनोर गावच्या मशिदीसमोर उपविभागीय पोलिस अधिकारी के. एस. हेगाजे, मनोरचे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप कसबे, साहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या; तर दहिसरतर्फे मनोर गावात पोलिस उपनिरीक्षक गणपत सुळे, फौजदार नारायण गोंड, पोलिस नाईक मनोज पाटील, कदम यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80945 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top