कवितेला वर्गीकरणांमध्ये अडकवू नका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कवितेला वर्गीकरणांमध्ये अडकवू नका!
कवितेला वर्गीकरणांमध्ये अडकवू नका!

कवितेला वर्गीकरणांमध्ये अडकवू नका!

sakal_logo
By

विरार, ता. ३ (बातमीदार) ः ‘‘कविता ही लहान मुलाच्या हास्यांसारखी अकृत्रिम असावी. कविता ही कविता असते वा एक तर नसते. कवितेला प्रेमकविता, निसर्गकविता, सामाजिक कविता अशा वर्गीकरणांमध्ये अडकवू नका; तर तिचा आस्वाद घ्यायला शिका,’’ असे मत ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केले.
कवयित्री सुरेखा कुरकुरे यांच्या ‘मनाचिये गुंती’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन बागवे यांच्या उपस्थितीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी मार्गदर्शन करताना बागवे बोलत होते. बहिणाबाईंच्या खान्देशातील कवयित्री सुरेखाच्या कवितेला तिथल्या मातीचा गंध आहे, असे गौरवोद्‍गार अशोक बागवे यांनी काढले.
आमदार हितेंद्र ठाकूर म्हणाले, सुरेखा कुरकुरे या आमच्या पक्षाच्याच माजी नगरसेविका आहेत. जेव्हा माझ्या एका नगरसेविकेचा सन्मान होतो तेव्हा तो माझाही सन्मान असतो. प्रकाशन सोहळ्यातील प्रमुख अतिथी म्हणून कवी सतीश सोळांकुरकर, ज्येष्ठ विचारवंत तेज निवळीकर, वसई-विरारच्या पहिल्या माजी महापौर प्रवीणा ठाकूर, कवयित्री व शब्दवेल प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पल्लवी बनसोडे, मुख्याधापक दीपक सुतार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी माजी महापौर प्रवीण शेट्टी, बविआचे संघटक अजीव पाटील, माजी स्थायी समिती सभापती जितुभाई शहा गझलकार ज्योती बालिगा-राव, जयप्रकाश चौधरी, ॲड. नयन जैन, उपप्राचार्य चंद्रकांत मराठे, दत्तात्रय देशमुख, शांताराम वाळिंजकार तसेच रिटा सरावैया, ज्योती राऊत, रंजना थाळेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कौतुक मुळे, कवी प्रकाश पाटील, मधुकर तराळे, विक्रांत केसरकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80947 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top