ईदच्या विक्रीमुळे व्यापारी सुखावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईदच्या विक्रीमुळे व्यापारी सुखावले
ईदच्या विक्रीमुळे व्यापारी सुखावले

ईदच्या विक्रीमुळे व्यापारी सुखावले

sakal_logo
By

मालाड, ता. ३ (बातमीदार) ः मुस्लिम समाजाच्या रमझान ईदच्या निमित्ताने होणाऱ्या चांगल्या विक्रीमुळे फेरीवाले, दुकानदार आणि व्यापारी सुखावले आहेत. मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सणासुदीलादेखील दुकानदारांची निराशा झाली होती.
निर्बंध हटवल्याने नागरिक निर्धास्तपणे बाहेर निघून बाजारात फिरून आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करत आहेत. ईदच्या निमित्ताने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याने फेरीवाले, दुकानदार आणि व्यापारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मालवणीतील बाजारात प्रचंड गर्दीमुळे पाय ठेवायलाही जागा नाही, अशी स्थिती पाहायला मिळाली. मालाडमधील बाजारातही तुडुंब गर्दी दिसली. त्यामुळे मालवणी ये-जा करणाऱ्या रिक्षा आणि बेस्ट बससाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. झरीन शेख या महिलेने सांगितले की गेल्या दोन वर्षात आम्ही घरा बाहेर ही बसलो नाही. मात्र आता ईदच्या निमित्ताने खरेदी करीत आहोत. फेरीवाला स्वप्नील डुंबरे म्हणाला, ईदच्या खरेदीकरिता मुस्लिम समाजातील नागरिक घराबाहेर पडल्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80948 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top